हातकणंगले (प्रतिनिधी) : समाजातील गरीब, उपेक्षित, दुर्बल रुग्णांना सेवा देण्याचे  माने केअर हॉस्पिटलचे काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी काढले. हेरले, (ता. हातकणंगले) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. माने यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हेरलेचे उपसरपंच राहुल शेटे होते.

या शिबिराचे जिजाऊ फाउंडेशनने आयोजन केले. यावेळी डॉ. अभिजित माने, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी १३० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली.

जिजाऊ फाउंडेशनचे उपाध्यक्ष राकेश जाधव म्हणाले की, जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने अशा प्रकारची शिबिरे वारंवार घेतली जातात. तरी गरीब रुग्णांनी  ८७२२७०२२२२ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले. यावेळी जिजाऊ फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सारंग पाटील- अतिग्रे, हेरलेचे उद्योगपती अर्जुन पाटील, पत्रकार अनिल उपाध्ये, युवा कार्यकर्ते अमर वड्ड, विनोद वड्ड, रणजित इनामदार आदी उपस्थित होते.