आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद…

0
67

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा काळ आणि अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणायत गरज भासू लागली आहे. यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षा सौ. संगिता मदने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

या शिबीराचे उदघाटन सौ.संगिता मदने,अमित शिंदे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभागी होवून रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. यावेळी कोल्हापूरच्या जीवनधारा ब्लड बँकेच्या सर्व स्टाफने रक्तदानाची प्रक्रिया चांगल्या पध्दतीने पार पाडली.

यावेळी सतीश माळगे, रॉबिन  कांबळे,रोहन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संदीप माने,अनिकेत शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.