नेताजी तरूण मंडळ, शाश्वत प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन कुंडाला उस्फूर्त प्रतिसाद… 

0
71

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील नेताजी तरूण मंडळ आणि शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन कृत्रिम कुंडाची व्यवस्था शिवाजी पेठेतील वरुणतीर्थ वेश, नेताजी तरूण मंडळाच्या जवळ करण्यात आली होती. या उपक्रमाला भागातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी परिसरातील नागरीकांनी भक्तिभावाने गणपती विसर्जन कृत्रिम कुंडात केले. तसेच निर्माल्य बाजूला ठेवून ते महापालिका यंत्रणेकडे दिले गेले.

यावेळी नेताजी तरूण मंडळाचे अध्यक्ष ओंकार भोसले,  उपाध्यक्ष अजिंक्य जाधव, सेक्रेटरी निलेश घाटगे, खजानिस आकाश करंबे, राजेंद्र डोकरे,  शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, उपाध्यक्ष राहुल चौधरी, सेक्रेटरी निलेश कांबळे, खजानिस अविनाश टकळे, अॅड. अभिजीत करंबे,  रोहित डोकरे, स्वप्निल कर्ले, अजय पाटील, रणजित घाटगे, शरद घाटगे, आरिफ पठाण, कार्यकर्ते उपस्थित होते.