शिरोळ (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमध्ये राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (शुक्रवार)  रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० ते १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर सांगली येथील आदर्श ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.  

यावेळी मदन कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य, नगरसेवक), उदयसिंह पाटील (बांधकाम सभापती, नगरपालिका), प्रकाश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष, नगरसेवक), अभिजित रवंडे (युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष), प्रसाद अनुरकर (विधानसभा अध्यक्ष युवक राष्ट्रवादी ), शहाजान टकळकी (राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष), नितीन कोकणे (शिक्षण मंडळ सदस्य), नागेश शेजाले (संजय गांधी निराधार समिती सदस्य), दत्ता देडे (माजी नगरसेवक) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.