इचलकरंजीत ‘मैत्री फौंडेशन’च्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
62

इचलकरंजी (प्रतिनिधी) : लहान वयातच मुलांच्या कला गुणांना अधिक वाव मिळण्यासाठी मैत्री फौंडेशनच्या वतीने व्यंकटराव हायस्कूलमध्ये आज (रविवार) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्‌घाटन राधेश्याम बंग यांच्या हस्ते व पदमचंद संघवी, सुरेश बोहरा, महेश लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ५ ते ८ वी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत शहरातील सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी मैत्री युवा परिवार, मैत्री फौंडेशनच्या सदस्यांनी नेटके नियोजन केले.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मैत्री युवा परिवारचे अध्यक्ष ऋषिकेश जोशी, उपाध्यक्ष श्वेता सातपुते, सदस्य विशाल मालू, धनश्री शिरगुप्पे, प्राची चराटे, ऐश्वर्या खोत, चिन्मयी वैद्य, गुरुप्रसाद वठारे, मंदार पाटील, स्नेहा आलासकर, पलक बगाडीया, रोहन शिंगाडे, प्रतिक मेंच आदींनी परिश्रम घेतले. तर  मैत्री फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड, मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय घाटगे, मैत्री महिला ग्रुपच्या अध्यक्षा वहिदा नेजकर, प्रफुल्ल घाटगे, सुरेश वैद्य यांचे सहकार्य लाभले.