सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला आज (मंगळवार) करवीर तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला.  दरम्यान, शेतकरी समन्वयक समितीतर्फ काँग्रेस नेते राजेंद्र सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बीडशेड,  कसबा बीड,  महे, कोगे, कुंभी-कासारी साखर कारखाना या मार्गावर  मोटरसायकल रॉली काढण्यात आली. यावेळी  कृषी कायदे रद्द करा,  केंद्र शासन हटाव, देश बचाव  अशा घोषणा  देण्यात आल्या.  

या रॉलीत यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील,  बाजीराव देवर्ड, एम.के.नाळे, भाकपचे दिनकर सुर्यवंशी, जयवंत जोगडे,  काँग्रेसचे बुध्दीराज पाटील, निवास पाटील, उत्तम पाटील,  सुभाष पाटील (वाकरे), सुनिल कापडे,  कुंडलीक पाटील (रयत संघ) यांच्यासह शेकडो  कार्यकर्त सहभागी झाले होते. दरम्यान, कसबा बीड,  कोगे, महे, सावरवाडी, शिरोली दुमाला येथील बाजार पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.  तर ग्रामीण भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.