अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
70

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पैलवान अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुना चंदूर रोड परिसरातील हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरमध्ये आयोजित केलेल्या शिबिराचे उद्‌घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर , उद्योगपती सतीश डाळ्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अथायु रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नेत्र विकार, हृदयविकार, हाडाचे विकार, पोटाचे विकार, मूत्र व किडनी, कॅन्सर, शुगर, ब्लडप्रेशर आदी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन, नगरसेवक अजित जाधव, नगरसेवक रविंद्र माने, जनसेवा पार्टीचे संस्थापक अजय जावळे, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, नगरसेविका तेजश्री भोसले, धर्मराज जाधव उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते पै अमृतमामा भोसले, नगरसेवक रविंद्र लोहार, माजी नगरसेवक संतोष शेळके, अवधूत पाटील, शुभम कोरे, सद्दाम मुल्ला, तुषार गोलंगडे, अनिल आंबले, ओंकार पवार, राजू खामकर यांनी परिश्रम घेतले.