संग्राम देशमुखांच्या प्रचार दौऱ्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   

0
42

पुणे (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज (गुरूवार) शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात प्रचार दौरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन विविध पदवीधर, शिक्षक यांच्या भेटी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांच्या मीटिंग घेऊन सुचना केल्या. देशमुख यांच्या तालुक्यातील प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.   

याप्रसंगी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगशेठ एरंडे व जिल्हा व तालुका भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.