कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (सोमवार) काहीशी घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,१८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १,५६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३४०, आजरा- ४२, भुदरगड- ३३, चंदगड- १५, गडहिंग्लज- २१, गगनबावडा- ६, हातकणंगले-१२६, कागल- ८०,  करवीर- १८४, पन्हाळा- ६४, राधानगरी- ५४, शाहूवाडी- २९, शिरोळ- ७३, नगरपरिषद क्षेत्र- १०२,  इतर जिल्हा व राज्यातील- १५ अशा १,१८४  जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ३४, ४९४

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, १८, १५९,

मृतांची संख्या – ४,२०५

उपचार सुरू असलेले रुग्ण – १२, १३०