नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आढळल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या विमानात एकूण २६६ जण होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचा नमुने संशोधनासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)कडे पाठवण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीतील कोविड-१९ च्या नोडक अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

यादरम्यान मुंबईतही लंडनहून आलेल्या दोन विमानातील प्रवाशांना विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये नेण्यात आले. येथे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान काही प्रवाशांनी यावर नाराजी दर्शवली आहे. याबाबत आम्हाला याबाबत कोणीच काही माहिती दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये अलिकडेच कोरोनाचा नवीन स्ट्रेन (बदललेले रूप) आढळले आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा सत्तर टक्के अधिक संक्रमिक असल्याचे म्हटले जात आहे.