सहकारातील आदर्श व्यक्तींचा गौरव हेच समाज परिवर्तन : राजाराम पाटील  

0
148

सावरवाडी (प्रतिनिधी)  : सामाजिक समतेच्या विचारातून सहकारी चळवळ आणि सामाजिक क्षेत्रात वर्षानुवर्ष समाजाभिमुख काम करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा गौरव करणे हेच समाज परिवर्तन असल्याचे असे प्रतिपादन शाहू सहकारी गुळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले. ते सत्कार सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम चव्हाण होते.

यावेळी कोल्हापूरातील मुख्य कार्यालयात संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ वरुटे यांची कोटेश्वर संस्थेच्या अध्यक्षपदी निवड, मल्हार सेनेच्या सरसेनापदी बबन राणगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रघुनाथ वरुटे, बबन राणगे, बळीराम चव्हाण, कावजी कदम, बाळासाहेब मन्नाडे, ग्रामस्थ उपस्थित होते.