गटनेते शारंगधर देशमुख यांची सामाजिक बांधिलकी

0
245

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता २०१९ च्या पुरामध्ये लक्ष्मीपुरी कामगार चाळ येथील पडलेली ३ घरे बांधून दिली. या नवीन बांधण्यात आलेल्या ३ घरांच्या चाव्या संबंधितांना देण्याचा सोहळा आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते आज (रविवार) पार पडला.

दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी गटनेते शारंगधर देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात कार्यकर्ते साजरा करतात. पण गेल्यावर्षी कोल्हापुरात महापूराने थैमान घातले होते. कोल्हापूरातील बऱ्याच नागरिकांना महापूराचा फटका बसला होता. अशा वेळेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी यावर्षीचा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे निश्चीत केले होते. त्याप्रमाणे वसंतराव ज.देशमुख हायस्कूल, तेजस मुक्त विद्यालय, सन्मित्र विद्यालय व देशमुख इंग्लिश मिडीयम या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच शारंगधर देशमुख वाढदिवस समिती व समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करुन जमा झालेल्या निधीतून लक्ष्मीपुरी येथील ३ पूरग्रस्त कुटुंबांची पडलेली घरे बांधण्यात आली. ही घरे आज जयश्री जावीद, अनिता पंडत, किरण कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, गणी आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.