…तर ‘पीपीई’ कीट घालून ‘एमपीएससी’ची परीक्षा द्यावी लागणार

0
123

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा येत्या २१ मार्चला होत  आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली आज (शुक्रवारी) जाहीर केली आहे. कोरोनाबाधित उमेदवारांनाही परीक्षा देता येणार आहे. परंतु त्यांना पीपीई कीट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एखाद्या उमेदवारास कोविड १९ ची लक्षणे दिसत असल्यास किंवा ज्यांची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था स्वतंत्र केली जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांना पीपीई किटही दिले जाणार आहे, असे नियमावलीत म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने १४ मार्चरोजी होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला होता. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर २१ मार्चला परीक्षा घेण्याचा सुधारित निर्णय आयोगाला जाहीर करावा लागला होता. आता या परीक्षांबाबत आयोगाने मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत.