…तर शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू : नितेश राणे

0
80

मुंबई (प्रतिनिधी) : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक असलेली गाडी, यात असलेला सचिन वाझे यांचा सहभाग या प्रकरणावरून आता राजकीय आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या आरोपांना उत्तर देताना सरदेसाई यांनी नितेश राणे यांना आव्हान दिले आहे. राणे यांनी केले आरोप सिद्ध करावेत नाही, तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, असा इशारा दिला आहे. यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू. आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.