…म्हणून इमरान हाशमीचा आलिया भट्टसोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार    

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता इमरान हाश्मी यांने एका रोमँटिक चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार दिला आहे. यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. आता इमरान हाश्मीने आलियासोबतच्या चित्रपटाला नकार देण्याचा खुलासा स्वत: केला आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट यांचा इमरान हा भाचा आहे. त्यामुळे नात्याने आलिया इमरानची बहिण लागते. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार दिला. 

दरम्यान, इमरान हाश्मी लवकरच ‘चेहरे’ आणि ‘मुंबई सागा’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्याचबरोबर ‘टायगर ३’ या चित्रपटात खलनायका च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.