…तर मी राजीनामा देणार : खा. सुजय विखे-पाटील

0
390

अहमदनगर  (प्रतिनिधी) :  राहुरीतील डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभाराबाबत भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्याचा पुढील ७२  तासांत कारभार सुधारला नाही, तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशारा  खासदार विखे यांनी दिला आहे. कारखान्याला भेट देऊन विखे यांनी प्रशासनाची खरडपट्टी काढली.

दरम्यान, बॉयलरमध्ये साखरेची पोती आढळून आल्याने कारखाना वारंवार बंद पडत आहे. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे झालेला  नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देण्याचा इशाराच विखे यांनी यावेळी दिला.