नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील आगामी एमएलसी निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी गरच पडल्यास बसपा भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांविरोधातील आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेऊ,  असे बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपला मत देऊ किंवा इतर पक्षाला. पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडले गेले. ही गोष्ट समाजवादी पार्टीला महागात पडेल, असा इशाराही मायावती यांनी दिला होता.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या होत्या.