गांधीनगरमध्ये होलसेलचे दुकान फोडून ४ लाख लंपास

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोळ्या- बिस्किटाच्या होलसेल दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना गांधीनगर मुख्य रस्त्यावरील तनवाणी कॉर्नरजवळील सहेज ट्रेडर्स या दुकानात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे गांधीनगर परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत अमन पहीलाजराय ओचवानी (वय ३३, अनंतपुरम् सोसायटी बापट कॅम्प) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर मेन रोडवर तनवाणी कॉर्नरजवळील केसवानी हॉस्पिटलसमोर असलेल्या सहेज ट्रेडर्स या गोळ्या बिस्किटांच्या दुकानाच्या टेरेसवरील लोखंडी दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आणि कॅश काऊंटरमधील ३ लाख ८० हजारांची रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.