इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये आज (गुरुवार) शिवगंगा सायझिंगला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. यामध्ये मशिनरी, वार्पिंग रोल, बिम, वायरिंगचा आणि रॉ मटेरीयल जळून खाक झाल्या. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ३ गाड्यां घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचे सायझिंगते मालक धनंजय पाटील यांनी दिली.

इचलकरंजी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या धनंजय पाटील यांच्या शिवगंगा सायझिंगला दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. मशिनरीजवळच मोठ्या प्रमाणात कापसाचे तंतू आणि कच्चा माल पडलेला होता. त्यामुळे ठिणग्या पडून आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. त्यामध्ये कापसासह सूत, वार्पिंग रोल, सूताची बिमे, कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना लक्षात आल्यानंतर तेथील कामगारांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण कापूस, सूत यामुळे आग फैलावत होती.

या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करत तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.