‘घाटगे पाटील’मधील सहा हजार किलो वेस्टेज चोरीस…

0
420

करवीर (प्रतिनिधी) : उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड या युनिटमध्ये सुमारे एक लाख ९२ हजार रुपये किमतीच्या स्क्रॅप मालाची चोरी झाली असून हे सुमारे ६००० किलोचे चिपिंग (वेस्टेज मटेरियल) आहे. याबाबत घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे सुरक्षा अधिकारी श्रीराम सदाशिव कोडगुले (रा. फुलेवाडी, ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्यादी दाखल केली आहे.  

फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीचा सुरक्षा अधिकारी या नात्याने मी दररोज कोल्हापुरातील सर्व युनिट्सना भेट देऊन मालक किरण पाटील यांना दररोज रिपोर्ट करत असतो. आज (सोमवार) दुपारी उचगाव येथील युनिटच्या भेटीप्रसंगी ६००० किलोचे चिपिंग (वेस्टेज मटेरियल) जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. या स्क्रॅप मालाची किंमत सुमारे एक लाख ९२ हजार इतकी आहे.

कोडगुले यांनी याबाबत मालक पाटील यांना माहिती देऊन गांधीनगर पोलीस ठाण्याबाबत फिर्याद नोंदवली