बोरपाडळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे उद्या (बुधवार) पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

यामध्ये दूधसंस्था, शेतीच्या बियाणांची दुकाने, औषधांची दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच शरद जाधव यांनी दिली. बोरपाडळे गावात आजअखेर ७३ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. तर तलाठी पल्लवी पाटील, ग्रामसेवक विनोद पाटील, कृषी अधिकारी माधुरी पाटील, ग्रा.पं. सदस्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.