मांडीला मांडी लावून बसला, त्यावेळी… : बाळासाहेब थोरातांचा भाजप-शिवसेनेवर निशाणा   

0
102
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केले आहे. या पत्रकांतून त्यांनी एकाच वेळी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत.  काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील ५ वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाहीतर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?, असा थेट सवाल थोरात यांनी केला आहे.