मुंबई (प्रतिनिधी) : सिंघम, वॉन्टेट सारख्या हिंदी तसेच विविध भाषेत काम करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्यांनी अकरा वर्षांपूर्वी पोनी वर्मासोबत लग्न केले. प्रकाश राज यांच्या  या नात्याला आज अकरा वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मुलांच्या समोर एक खास सेलिब्रेशन केले आहे.

प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मुलांसमोर पत्नी पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केले आहे. या लग्नाचे कारण त्याची मुले देखील होती आणि त्यानी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे.त्याच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करताना प्रकाश राज यांनी सांगितले आहे की, त्यांनी पुन्हा एकदा  पत्नी पोनी वर्माशी लग्न केले आहे.

कारण त्याचा मुलगा वेदांतला या दोघांना पुन्हा लग्न करताना बघायचे होते. या फोटोंमध्ये प्रकाश राज पत्नी आणि मुलांसोबत दिसत आहे. एका चित्रात प्रकाशराज आपल्या पत्नीला किस करतानाही दिसत आहे.