कुरुंदवाड (प्रतिनिधी) : दुध खरेदी केली जाते त्या काट्याची अचानक धाड टाकून अचूकता तपासली असता हेरवाड आणि टाकवडे या दोन गावातील डेअरीवर तालुका वजन मापे अधिकारी म. आ. मोदी यांनी धाड टाकली. यावेळी उत्पादकांकडून जादा दुध घेतले जात असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर वैधमापन शास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल झाले आहेत.

हेरवाड येथील शेतकरी सहकारी दुध येथे ४ लिटर दुधामध्ये १०० मिली. दुध ज्यादा घेतल्याचे सापडले. तर टाकवडे येथे खासगी दुध संकलन केंद्रात मापात पाप करताना सापडले. त्यामुळे गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यातील दुध संस्थामध्ये खळबळ माजली आहे.