कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाले असून ५४६ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ६, भुदरगड तालुक्यातील १,  चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील ४, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ५, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा २९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील १ आणि करवीर तालुक्यातील मोरेवाडी येथील १ अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ५८० झाली असून ४६, २२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५९ जणांचा मृत्यू झाला असून ६९६ जणांवर उपचार सुरू आहेत.