मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात २९५६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १७२४  रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.

आज राज्यात २९५६  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर २१६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून, मुंबईत आज १७२४  रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या चार मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण २१५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण ७७,४९, २७६  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.९० टक्के इतके झाले आहे. मृत्यूदर हा १.८६  टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज एकूण १८२६७ सक्रिय रुग्ण आढळले असून, मुंबईत सर्वाधिक म्हणजे ११८१३ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ३४०३  इतके सक्रिय रुग्ण आहेत.  गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६५९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ५४८ पर्यंत पोहोचली आहे.