जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट…

0
272

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ११ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,२१६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील २,  करवीर तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण  ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नवले कॉलिनी कोल्हापूर येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,४६४.

एकूण डिस्चार्ज : ४७,६९३.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ७१.

एकूण मृत्यू :१,७००.