इचलकरंजी येथील वरदविनायक मंदिर परिसरात शुकशुकाट  

0
96

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगारकी संकष्टीनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायक मंदिर  आज (मंगळवार) भाविकांना दर्शनासाठी  बंद ठेवण्यात आले आहे.  मंदिरात काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजाअर्चा करण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.  मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर करडी नजर ठेवली आहे. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. अंगारकी संकष्टी निमित्ताने पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायक मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी  होती. त्यामुळे प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.