वाळवा ( प्रतिनिधी) : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते शुभम पाटील समाजाचे काही तरी देणे लागतो. या भावनेतून सतत सामाजिक कामात कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या पाटील यांची महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील पोलिसांच्या विविध समस्या, अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी निवडीनंतर दिली आहे.

शुभम पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नेर्ले येथे पूर्ण केले आणि उच्च माध्यमिक शिक्षण इस्लामपूर येथे पूर्ण केले आहे. त्यांनी २०१६ पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. त्यांचे सामाजिक काम पाहून जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील आणि राजवर्धन पाटील तसेच राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संग्राम पाटील यांनी त्यांची २०१८ मध्ये वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदावर निवड केली.

गेल्या दोन वर्षात त्यांनी नेर्ले परिसरातील शेतकऱ्यांना फवारणी पंप, विद्युत मोटार, चाफ कटर मशीन, महिलांना शिलाई मशीन आदी साहित्यांचे वाटप केले आहे. तसेच रक्तदान शिबिर, मोफत आधार कार्ड शिबिर, कोरोना काळामध्ये मोफत मास्क सॅनिटायझर वाटप व अल्पदरात वाफारा मशीनचे वाटप केले आहे.