इचलकरंजीतील शुभम कमलाकर खुनाचा उलगडा : चौघांना अटक

0
608

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोची माळावर असणाऱ्या चव्हाण टेकडी येथे झालेल्या शुभम कमलाकर खून प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी अनिल पांडव, सुनिल पांडव, स्वप्नील कोळी, वीरेश हिरेमठ या  आरोपींना शिवाजीनगर पोलीसांनी पट्टणकोडोली येथून आज (गुरुवार) अटक केली. या आरोपींना अटक करून त्यांना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

मंगळवारी रात्री शुभमचा अज्ञातांनी खून केला होता. यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी आपली तपासचक्रे फिरवली होती. यामध्ये आज या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मगर, राफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतरी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, अविनाश भोसले, विजय माळवदे यांनी केली.