श्री सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर मंगळवारी बंद

0
101

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री सिध्दीविनायक (जयंती ओढ्यावरील गणपती मंदिर) आणि महाव्दार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिर मंगळवारी (दि.२) भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने पत्रकाद्वारे दिली आहे.

या दिवशी भाविकांना अभिषेक करण्यासही मनाई कऱण्यात आली आहे. परंतु मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत अंगारकी संकष्टीनिमित्त करण्यात येणारे धार्मिक विधी, पूजाआर्चा होणार आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.