टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उरूस, यात्रा भाविकांसाठी रद्द कराव्यात असे आदेश दिले आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सादळे (ता. करवीर) येथे  श्री सिद्धेश्वर यात्रा आयोजित केली जाते. मात्र, यंदा ही यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटी सदस्यांतर्फे देण्यात आली. यात्रेदिवशी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी होणार आहेत.

आज शिरोली ठाण्याचे सपोनि. किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सादळे येथील प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या वेळी सादळे ग्रा. पं. सदस्य, तरुण मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते, देवस्थान कमिटी सदस्य यांनी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी सिध्देश्वर यात्रा रद्द करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. या दिवशी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

या बैठकीस पोलीस पाटील दिपक परमित, शोभा कांबळे, दादासो पाटील, निखिल पाटील, पंकज पाटील, रमेश जाधव, आप्पासाहेब आडके, बाबासाहेब पाटील, सचिन कांबळे, शिवाजी कांबळे उपस्थित होते.