शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मंदिर राहणार बंद…

0
71

नगर (प्रतिनिधी) : राज्यात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध यात्रा, जत्रा, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर (जि. नगर) येथे श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी शनी अमावस्येला गर्दी होते. मात्र जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढीमुळे शनीशिंगणापूर येथील शनिमंदिर शुक्रवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमावस्या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दिली.

नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता शनी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन बंद राहील. रविवारी दि. १४ मार्च रोजी दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होईल. नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागूल यांनी केले आहे.