श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाकडून स्मशानभूमीस शेणींसाठी ५१ हजारांचा धनादेश

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील लोकांवरही शहरातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नियोजनापेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने महापालिकेला अंत्यसंस्कारासाठी  शेणींची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वजनिक मंडळ, समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना शेणीदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या उपक्रमाचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत महापालिकेच्या स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणाऱ्या शेणींसाठी श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाकडून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे ५१ हजारांचा धनादेश आज (शनिवार) देण्यात आला. 

शहरातील विविध संस्था, तालीम मंडळ, दानशूर व्यक्ती यांच्याकडून पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी, बापटकॅम्प या स्मशान भूमीमध्ये शेणी दान करण्यात येत आहेत. आज श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी श्री छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजानिस, सेक्रेटरी  व कार्यकर्ते उपस्थित होते.