मुख्यमंत्री, कामगार मंत्र्यांनी कामगार कायद्याचे संरक्षण करावे : श्रमिक संघाची मागणी

0
101

टोप (प्रतिनिधी) :  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आताचे कामगार कायदे उद्ध्वस्त करीत ते दलाल भांडवलदारांच्या प्रभावाखाली काम करीत आहे. अशा प्रकारच्या कायद्यातील बदलांना आमचा विरोध आहे. त्यामुळे कामगार कायद्याचे संरक्षण करावे व राज्यात औदयोगिक शांतता बहाल करून येथे सुबत्ता नांदेल याची हमी तयार करावी, असे आवाहन कोल्हापूरच्या श्रमिक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केले आहे. शिरोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांना याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) देण्यात आले.

या वेळी सर्व श्रमिक संघ जिल्हाध्यक्ष कॉ. अतुल दिघे, कोल्हापूर स्टील, साऊंड कास्टींग्ज, यश मेटॅलिक्स, परफेक्ट पिन्स, नॅट फौंड्री, इडी स्टील, श्रीराम फौंड्री, नीता इंजिनअरिंग, अॅक्युरेट इंजि., श्रीराम म. शॉप, एस. जे. आयर्न, राधानगरी पॉवर प्रोजेक्ट,  झंवर एक्सपोर्ट आदी कंपन्यांतील कंपनीतील कामगार नेते उपस्थित होते.