दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : गावातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाईल, यासाठी गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, असे सांगून दूध उत्पादकांना दोन पैसे जादा देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोकुळच्या निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. नागाव (ता.करवीर) येथे १ कोटी २७ लाख ३३ हजार निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, दक्षिण मतदारसंघामध्ये विकास कामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही. नागरिकांनी हक्काने विकासकामे घेऊन यावे,  बंटीसाहेबांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली जे ठरवतो ते ठरल्याप्रमाणे करतो.

यावेळी करवीर पंचायत समितीचे उपसभापती किरण पाटील, विजय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सरपंच दिपाली नाईक, उपसरपंच कृष्णाबाई राणगे, एकनाथ पाटील, सागर पाटील, विलास साठे, मारुती निगवे, विश्वास दिंडोर्ले, दिगंबर पाटील, बापूसाहेब खामकर, संजय नाईक, मेजर राणगे, दिनकर मगदूम, युवराज कोराणे, राजाराम तोरस्कर, तानाजी मगदूम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.