दुकान बंद होऊ नये, म्हणून फडणवीसांची टीका : अनिल देशमुख

0
116

पुणे (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या कामावर सतत टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला आहे. सरकारने चांगले काम केले, तरी फडणवीस टीकाच करणार आहेत. त्यांचे दुकान बंद होऊ नये, म्हणून ते टीका करत असतात, असे देशमुख यांनी म्हटले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहाला आज (शुक्रवार) भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले की, कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या वाढली आहे. कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. तसेच भविष्यात कारागृह आधुनिक करण्यात येणार आहे. भिडे गुरूजी, एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल. तसेच चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.