कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रेम प्रकरणातून तरूणीवर गोळीबार केल्याचा प्रकार आज (शुक्रवार) पहाटे कळंबा येथे घडला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबार करणारा तरूण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गोळीबार झाला की नाही, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, छऱ्याच्या बंदुकीतून हल्ला झाल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित तरूणीला ताब्यात घेतले आहे. गोळीबार करणाऱ्या तरूणाचा त्याच्या घरामध्ये शोध घेतला असता तो आढळून आला नाही. अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.