टोप (प्रतिनिधी) :  अर्जुन पुरस्कार प्राप्त कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने ऐतिहासिक कामगिरी करत क्रोएशियामध्ये झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले होते. याबद्दल शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर स्मॅकच्या वतीने अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते छ. राजर्षी शाहू महाराजांची मूर्ती देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अतुल पाटील म्हणाले की, घरांमध्ये या खेळाविषयी कोणतीही पार्श्वभूमी नसताना वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर नेमबाजीत सुवर्ण पदकांसह अन्य पदकांवर आपली मोहर उमटवली आहे. कोल्हापूरवासियांच्या मनात तिने आपली विशेष स्थान निर्माण केले असून राही कोल्हापूरचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी राही सरनोबत म्हणाल्या की, टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेतील  अनुभव मला नक्कीच २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उपयोगी पडणार आहे. आगामी काळात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला लागणार असून  सराव करून नक्कीच देशासाठी पदक जिंकणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौउंड्रीमेन कोल्हापुर चॅप्टर (आय आयएफ) च्या अध्यक्षपदी रविंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल स्मॅकचे उपाध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्मॅकचे ट्रेझरर एम. वाय. पाटील, आयटीआय चेअरमन राजू पाटील, कोल्हापूर फाउंड्री प्लास्टर चेअरमन सचिन पाटील, सेमिनार कमिटी चेअरमन अमर जाधव, संचालक प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, स्वीकृत संचालक सोहन शिरगांवकर, निमंत्रीत सदस्य बी. एम. सोमैया,  नामदेव पाटील, शेखर कुसाळे, बदाम पाटील, रोहित मेनन, अजिंक्य सरनोबत आदी उपस्थित होते.