धक्कादायक : गणवेश फाडत तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला मारहाण

0
265

मुंबई (प्रतिनिधी) : चार तृतीयपंथीयांनी मिळून वाहतूक पोलिसाला मारहाण करत त्याचा गणवेश फाडल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेले विनोद सोनवणे असे मारहाण झालेली पोलिसाचे नांव आहे. या घटनेची पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 

विनोद सोनवणे यांनी तीनहून अधिक प्रवासी एका ऑटो रिक्षातून प्रवास करताना  दिसले. त्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकऱणी ही रिक्षा थांबवली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे रिक्षाचालकांना नियम लागू केले आहेत. असे सांगून सोनवणे यांनी रिक्षाचा फोटो काढला. त्यानंतर रिक्षातील एक तृतीयपंथी खाली उतरुन सोनवणे यांच्याशी हुज्जत घातली. हा वाद टोकाला पोहोचला. त्यानंतर रिक्षातील दोन्ही तृतीयपंथीयांनी उतरून सोनावणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  यात  त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर सोनावणेंचा गणवेशही फाडला आणि त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून घेत खाली जमिनीवर टाकून दिली. दरम्यान, याप्रकरणी लवली करण पाटील, विकी रामदास कांबळे, तनू राज ठाकूर आणि जेबा जयंत शेख अशी या चार तृतीय पंथीयांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.