धक्कादायक : उपवडेत अपघातात मृत्यू झालेल्या मातेवर मुलाने परस्पर केले अंत्यसंस्कार

0
217

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी (ता.करवीर) येथील एका तरूणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण दिनकर माने यांनी निलेश रघुनाथ दळवी (वय २६, रा. उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी) याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश दळवी ६ डिसेंबररोजी आपली आई बाळाबाई रघुनाथ दळवी (वय ५५) यांना आपल्या मोटारसायकलवर बसवून बोलोली गावाच्या हद्दीत शिपेकरवाडी फाट्यावरून जात होते. त्यावेळी निलेश यांने मोटारसायकल भरधाव वेगात चालवल्याने त्यांच्या आई बाळाबाई दळवी या रस्त्यावर जोरात आपटल्या. यात त्यांच्या डोक्याला जोराचा मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेल्या निलेश यांने पोलीस ठाण्यात वर्दी न देता आईवर स्माशनभूमीत परस्पर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.