धक्कादायक :  नवे चावरे येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून २ चिमुकल्यांवर अत्याचार

0
1202

टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील  नवे चावरे येथे एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने दोन लहान मुलींवर अत्याच्यार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुली या सख्ख्या बहिणी असून त्या अनुक्रमे पाच आणि तीन वर्षाच्या आहेत. या प्रकरणी या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात पेठवडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिडीत मुली या सख्ख्या बहिणी असून त्या पाच आणि तीन वर्षांच्या आहेत. या आरोपीने २७  आणि २९ जुलै रोजी स्व:ताच्या जनावरांच्या गोठ्यात या मुलींवर अत्याचार केले आहेत. याबाबतची फिर्याद पिडीत मुलींच्या आईने पेठवडगांव पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि. स्वाती सुर्यवंशी करीत आहेत.