धक्कादायक : मुख्याध्यापकासह ९ शिक्षकांचा ४ विद्यार्थिनींवर बलात्कार

0
247

जयपूर (वृत्तसंस्था) : एका सरकारी शाळेत ९ शिक्षक आणि मुख्याध्यापकाने मिळून ४ विद्यार्थीनींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर ३ शिक्षकांनी एक वर्षभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच दोन महिला शिक्षकांवर या कृत्याचा व्हिडिओ काढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच सहावी, चौथी आणि तिसरीमध्ये शिकणाऱ्या आणखी तीन पीडित मुलींनी  मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले.  तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे मुलींनी सांगितले.