कबनूरच्या सरपंचपदी शोभा पवार, उपरसपंचपदी सुधीर पाटील बिनविरोध…

0
95

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूरच्या सरपंचपदी ग्रामस्थ आघाडीच्या सौ. शोभा पोवार यांची तर उपसरपंचपदी सुधीर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी जेरान गोन्साल्वीस होते.

या निवडीसाठी सकाळी अकरा वाजता शोभा पवार आणि सुधीर पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. दुपारी दोन वाजता सर्व सदस्यांची सभागृहात बैठक बोलण्यात आली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी सुधीर लिगाडे, समीर जमादार,रजनी गुरव,रोहिनी स्वामी,सुनीता आडके, मधुकर मणेरे,स्वाती काडाप्पा, सैफ मुजावर,अर्चना पाटील,वैशाली कदम,सुलोचना कट्टी, प्रवीण जाधव,सुधाराणी पाटील ,सुनील काडाप्पा,ग्रामविकास अधिकारी बी.टी.कुंभार,तलाठी एस.डी.पाटील,कोतवाल शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.