कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींसाठी अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

नेर्ली (ता.करवीर) येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाची पाहणी आ. पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. 

नेर्ली गावातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होवोत, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

यावेळी  सरपंच प्रकाश पाटील,  उपसरपंच संजय चौगले,  अजित पाटील,  हंबीरराव पाटील,  जनार्दन पाटील,  नंदु पाटील, अरविंद पाटील, अमर पाटील, संतोष पाटील, रायगोंडा पुजारी,  प्रदीप चौगुले,  निखील पाटील,  अतुल पाटील, अजिंक्य पाटील, अमर नरके,  अविराज कांबळे, अक्षय सडोले, राहुल लोखंडे आदी उपस्थित होते.