पुणे (प्रतिनिधी) : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे  वृद्धापकाळाने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्येत मालवली. सकाळी साडे आठ वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आले.   त्यानंतर  त्यांची अंत्ययात्रा  काढून  वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुप्रिया सुळे,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  खा. उदयनराजे यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.