विधानसभेवर भगवा फडकण्यासाठी कुचराई नको…

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

0 74

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शिवसेनेला पुन्हा सत्ता हवीच आहे, त्यासाठी कुचराई न करता, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत आम्ही सुडाचे राजकारण करत असल्याचे आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करीत नाही. अयोध्येत बाबरी मशीद पडली, आणि दंगल मुंबईत घडली. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटावेळी सुधाकर नाईक – शरद पवार यांचेच सरकार होते. त्यावेळी शिवसेनेनेच हिंदूंना वाचवले. सरकारने ‘सामना’चा जुना अग्रलेख शोधून काढला आणि शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या अटकेच्या अफवा पसरून सर्वसामान्याचे हाल केले. विद्यार्थांना शाळा, महाविद्यालय सोडावी लागली.  शेवटी बाळासाहेब स्वतः न्यायालयात हजर झाले. यावेळी न्यायालयाने हा खटलाच होवू शकत नाही असे सांगितले. तेव्हा तुम्ही गप्प का होता, असा प्रश्न उद्धव यांनी पवारांना केला.

शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी जे शस्त्र उगारले ते शस्त्र आज त्यांच्यावर उलटला आहे. हिशोब बरोबर झाला. शिवसेना संपवण्याची भाषा सगळ्यांनी केली मात्र ते जमलं कुणालाही नाही. उलट शिवसेनेची ताकद वाढली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे तुमच्या कर्माचे फळ आहे. पाणी मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला तुम्ही काय उदाहरण दिले ते आठवा. त्यावेळी काय बोललात ते विसरू नका.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More