शिवसेनेतर्फे पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम…

0
258

पन्हाळा (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पन्हाळगडावर शिवसंपर्क मोहीम आयोजित केली होती. यावेळी गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या रिक्त जागेवर नवीन नेमणुका करणे, शिवसैनिक सभासद नोंदणी याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळ संचालकपदी निवड  झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील, सर्जेराव पवार, अशोक चव्हाण, मारुती माने, फारूक मुजावर, कुलदीप बच्चे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुखांच्या हस्ते पन्हाळा उपशहरप्रमुखपदी जुनेद मुजावर, प्रवीण शिंदे, भगवान भाकरे यांची निवड करण्यात आली.

तर संजीवनी गायकवाड यांची शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुखपदी दीप्ती कोळेकर यांच्यामार्फत नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. त्याचबरोबर टायगरग्रुपचे गणेश पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.