छ. शिवरायांच्या ‘जगदंबा’ तलवारीसाठी ‘शिवदुर्ग’चे पुण्यातील क्रिकेट मैदानात आंदोलन

0
47

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लंडमध्ये असलेली जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी कोल्हापुरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहेत. सध्या इंग्लंडचा संघ भारतात क्रिकेट सामने खेळण्यासाठी भारतात आला आहे. पुण्यातही काही सामने होणार आहेत. आज (सोमवार) याच मागणीसाठी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आंदोलन करण्यात आले.

आज (सोमवार) सायंकाळी ५ वा. हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात जाऊन भगवा फडकवत आंदोलन केलं. या मैदानावर होणाऱ्या सामन्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी तळेगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.