छ. शिवरायांचे आचार, विचार, संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी : रविंद्र आपटे  

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिवविचार मार्गदर्शक ठरले आहेत, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी आज (शुक्रवार) येथे केले. शिवजयंतीनिमित्त संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक व चेअरमन रविंद्र आपटे यांनी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ज्येष्‍ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास जाधव,  दीपक पाटील, उदय पाटील,  बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्‍यजित पाटील, विजय  तथा बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी, एस. एम. पाटील, व्‍यवस्‍थापक (प्रशासन) डी.के.पाटील, जनसंपर्क अधिकारी पी.आर. पाटील, चेतन नरके, रघु पाटील आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.